Friday 3 June 2016

Interview with Akshay Kumar


ऍडल्ट कॉमेडीत काम करेन - अक्षय कुमार

-      हर्षदा वेदपाठक

रोमॅन्टीक चित्रपट केल्यावर अक्षय कुमार पुन्हा ऐकवार कॉमेडीपटांकडे वळला आहे. किंबहुदा तो असा एकमेव कलाकार आहे जो, मल्टीप्लेक्स बरोबरच एकपडदा (सिंगल स्कीन) चित्रपटगृहांतही उत्तमरीत्या यशस्वी ठरतो. हाऊसफुल तिन या चित्रपटासह त्यांच्याबरोबर केलेली बातचित...

पुन्हा एकवार विनोदी चित्रपटांकडे वळलात काय सांगाल त्याबद्दल ?

समाधान वाटतय.. हाऊसफुल तिन हा चित्रपट माझ्यासाठी ऐेक स्टेस बस्टर आहे असं म्हटलं तरी चालेल. पण त्याच दरम्यान दमायलाही झालय कारण, आम्ही ऐका टेकमध्ये सगळे सिन आणि संवाद सादर करत होतोत. तसं करण्यामागचे कारण म्हणजे, विनोदी चित्रपटांत संवाद म्हणताना ऐका सलग वेळेत सगळे संवाद म्हटलेत तरच गंम्मत येते नाहीतर त्याची मजा निघुन जाते. तब्बल दोन वर्षानंतर मी विनोदी चित्रपटांकडे वळलो आहे.

कौटुंबिक विनोदी चित्रपटांत एकसुरीपणा येतो, तो सॅक्स कॉमेडीत नसतो असे रितेश देशमुख म्हणतो..तुम्ही काय सांगाल त्यावर ?

मला नाही वाटत तसं, त्या दोन्ही विषयात सॅच्युरेशन आले आहे म्हणुन. अजुनही नाविन्यता देता येणं शक्य आहे. ऍडल्ट कॉमेडीसाठी मला विचारणा झाली तर मी नक्कीच काम करेन.

हाउसफुल तिन हा चित्रपट त्यापुर्वीच्या दोन चित्रपटांपेक्षा कसा वेगळा आहे ?

मागिल दोन चित्रपटांपेक्षा या चित्रपटामध्ये पात्रं वेगळी आहेत. मात्र चित्रपटांची जातकुळी तिच आहे. तुम्हाला जर सुरवातीचे दोन भाग आवडले असतील तर तिसरा भाग पण आवडेल हेच मी सांगु शकतो.

हाऊसफुल या चित्रपटाच्या श्रृंखलेत अभिषेक बच्चन पहिल्यांदाच काम करत आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा राहीला ?

आम्ही आधि काही चित्रपटांमध्ये काम केलेले आहे, त्यामुळे त्याचा विनोदाचा टायमिंग फार उत्तम आहे हे मी जाणतो. वास्तविक जिवनात देखिल त्याचा सेन्स ऑफ हुयमर उत्तम आहे.

तुमचे विनोदी चित्रपट उत्तम चालत असताना, अचानक विनोदी चित्रपटांपासुन फारकत घेण्याचे कारण काय...ऐकसुरीपणा दुर करण्यासाठी काय ?

मी तसं म्हणणार नाही. मला माझी इमेज तयार करायची नाही तर वेगवेगळे चित्रपट करायचे आहेत. म्हणुन मी चित्रपट निवडतानाच वेगळेपणा पाहतो. एकसुरीपणाचा कंटाळा येतो म्हणुन मला अभिनयामध्ये वेगळेपणा द्यायला आवडते इतकेच नव्हे. तर मला स्वतालाच आव्हान दयायला आवडते. म्हणुऩ मला इमेजमध्ये बांधुन घ्यायचे नाही. माझे चित्रपट देखिल मी चाळीस दिवसांत संपवतो आणि पुन्हा वेगळेपणाच्या शोधात निघतो.

हाउसफुल तिनबद्दल बोलायचे तर तुम्ही, अभिषेक आणि रितेश एक उत्तम अभिनेता आहात. विनोदी चित्रपटांबद्दल बोलायचे तर चित्रपटाची सगळी मदार अभिनेत्यांवरच का राहते. अभिनेत्री मात्र शोपीस म्हणुन दिसतात...शोलेची बसंती किंवा मिस्टर इंडीयातील हवाहवाई प्रमाणे अभिनेत्रींसाठी भुमिका का नाही लिहील्या जात ?

या मुद्याबरोबर मी सहमत नाही. हाऊसफुल तिन या चित्रपटात मुलींना देखिल अभिनयाची संधी आहे.

शाहरुख खान आणि प्रियांका चोपडा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेथे रेसीझम होतो हे ते जाहीरपणे  सांगतात...तुम्हाला तसा कधी अऩुभव आला आहे काय ?

येतात ना तसे अऩुभव...वाईट प्रघात आहे तो...मी मात्र त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. उगाचच लक्ष  देऊन कशाला मोठेपणा दया. गोरे लोकं जेव्हा येथे येतात तेव्हा तुम्हाला वाटतं त्यांच्याबरोबर असं काही होत नाही. मला वाटते हा प्रकार सगळीकडेच घडतो.

चित्रपटसृष्टीबाहेरुन येऊन येथे पंचविस वर्षाची कारकीर्द केलीत. इतकच नाही तर यशस्वी देखिल झालात त्याचे श्रेय कोणाला दयाल ?

नशिबला...माझ्या यशाचे साठ ते सत्तर टक्के श्रेय नशिबाला जाते आणि त्यानंतर मेहनतीला देईन. यशस्वी होण्यासाठी मी खुप मेहनत केली. त्यात योग्य चित्रपटांची केलेली निवड देखिल महत्वाची आहे. असेही नाही कि माझे प्रत्येक चित्रपट यशस्वी झालेत तरी देखिल मी तरलो. मी जेव्हा स्टुडीयोत जातो तेव्हा अऩेकांचे सुंदर पोर्टफोलीयो मी पाहिलेत. अनेकांचे चेहरे, शरीरयष्टी सुंदर असलेली आपण पाहतो. तरी देखिल ते मागिल अनेक वर्ष स्टगल करीत आहेत...का बरं...तर यालाच मी नशिब म्हणतो. आणि माझा नशिबावर विश्वास आहे.

मसाला चित्रपट करताना तुम्ही वास्ताववादी चित्रपट पण केलेत ?

स्पेशल छब्बीस, बेबी. ऐअरलिफ्ट, या सारख्या चित्रपटांना पसंद केलं जात आहे ते निव्वळ त्याच्या कन्टेन्डमुळे. त्याचा फायदा केवळ माझ्याच चित्रपटांना नव्हे तर उत्तम कन्टेन्ड असलेल्या अनेक चित्रपटांना झाला. त्यात निरजा या चित्रपटाचे देखिल नाव घेता येईल. आपल्या चित्रपटांचा व्यावसाय हॉलीवुड घेत आहे, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच बरोबर आपण आपली बॉक्स ऑफीस जमा यावरुन हॉलीवुडबरोबर स्पर्धा करु शकत नाही हे हि तितकच खरं आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त कंन्टेन्डच उरतो तेथे लक्ष केंन्द्रीत करायला पाहिजे.

एकपडदा चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्सवर ज्या कलाकारांचे चित्रपट यशस्वीरीत्या चालतात त्यात तुमचे नाव घ्यावे लागते त्याबद्दल काय सांगाल ?

मी या विषयावर कधी विचारच केला नाही. मला ज्या कामासाठी विचारणा होते त्यामधुन मी माझे काम निवडतो. तर कधी माझा अनुभव लावुन भुमिका निभावुन नेतो. या सगळ्याचा परिणाम कधी अचुक होतो तर कधी चुकीचा. मात्र मी काय काम करायचं हे ठरवतो किंवा अगदी गणितं मांडुन चित्रपट निवडतो असं अजिबात म्हणता येणार नाही.

तुमचे चित्रपट आणि कारकीर्द सर्वेत्तमरीत्या सुरु असताना, दक्षिणेत जावुन, रोबोट 2 या चित्रपटासाठी  खलनायक रंगवायची गरज का बरं पडली ?

रॉबोट 2 मधिल भुमिका मला आव्हानात्मक वाटली म्हणनु मी तो चित्रपट स्विकारला. रजनीकांत सरांकडुन मार खाणं देखिल प्रतिष्ठेचं आहे ते विसरुन चालणार नाही. सुपरहिरो तर अनेक जणं निभावतात मात्र, सुपरहिरोसमोरील व्हिलन हा देखिल ऐक अऩोखापणा आहे असं मला वाटतं.

हल्लीच्या काही दिवसांमध्ये असं दिसुन आलय की, अभिनेत्री या विदेशात जावुन निरनिराळ्या भुमिका मिळवत आहेत. मात्र अभिनेता तसं काही करताना दिसत नाहीत त्यामागचे कारण काय असावे ?

मला वाटंत आम्ही कदाचित त्या भुमिकेसाठी योग्य नसु. किंवा आम्ही तेथे कोणाला नको आहोत. या विचारसरणीमागे मी कन्टेन्डेट नाही असे म्हणेन. तसेच मला कधी तेथिल भुमिकांसाठी विचारणाच झाली नाही. झालीच तर ती, अगदी लहानश्या भुमिकसाठी आणि त्याची (हसुन) परिणीती पडदयावर जिव गमावण्यात होते. कशाला करायच्या अश्या भुमिका. मला वाटतं मी येथेच सुखात आहे.

पंचविस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीच सॅक्स कॉमेडी केलीत नाहीत. तुम्ही अश्या चित्रपटांच्या विरोधात आहात

अजिबात नाही. मी त्याप्रकारचे चित्रपट आवडीनं पाहतो. कधी विचारणा झाली तर नक्कीच करेन तश्या चित्रपटांत काम.

मोठ्या अपेक्षा आणि वेगळ्या भुमिका असलेल्या चित्रपटाला जेव्हा पारितोषिक मिळत नाही तेव्हा काय वाटते

तुम्ही जर त्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नाचणार असाल तर तुमच्या उरलेल्या अर्ध्या फीच्या बदल्यात तुम्हाला पारितोषिकं दिली जातात, नाहीतर नाही. मला या सगळ्यासाठी अनेकदा विचारले गेले आहे मात्र मी सतत त्यास नकार देत आलो आहे.

हल्ली अनेक कलाकारांची मुलं चित्रपटांत येत आहेत. जेणेकरुन चित्रपटसृष्टी बाहेरील लोकांना येथे काम करण्याची संधी मिळणार नाही असं तुम्हीला वाटतं काय

अजिबात तसं नाही आहे. बाहेरची लोकं येत आहेतच. मी पण बाहेरचा होतो, रणवीर सिंग..सिध्दार्थ मल्होत्रा बाहेरचा आहे. तरी देखिल त्यांनी येथे ठसा उमटवला आहेच ना. मला वाटतं प्रत्येकाला कोणती ना कोणती भुमिका निभावायची संधी मिळेल. आणि हे सगळं तुमच्या नशिबावर तसेच तुम्ही किती मेहनत करता त्यावर अवलंबुन आहे.  

No comments:

Post a Comment